मोदी खोटारडा आहे…


राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
मोदी जोवर जिवंत आहे तोवर एसटी,एससी, ओबीसी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही.वंचित वर्गाच्या अधिकारांचा मी चौकीदार आहे.असे नरेंद्र मोदी नंदुरबार मध्ये बोलले, मात्र त्यांची सत्ता असलेल्या महाराष्ट्र राज्यात गेली तीन वर्षे अधिक काळ शिष्यवृत्ती, स्वाधार निधी नाही.शिक्षण हक्क कायदा मोडीत काढून (आर टी ई) बंद करण्यात आली होती, परदेशी शिष्यवृत्ती योजना व्हेंटिलेटर वर आहे, बार्टी, सारथी, महाज्योती मध्ये संशोधन होणार नाही, प्रशिक्षण मिळणार नाही अशी कमिशनखोर नियम बनविले आहेत.स्पर्धा परीक्षा असो की शिष्यवृत्ती सर्व परीक्षा मध्ये सेटिंग आणि गैरप्रकार आहेत.आंदोलने, मोर्चे होतात मात्र दखल घेतली जात नाही.राज्यात शासकिय नोकरीसाठी अधिकारी कर्मचारी ह्यांचे वर्ग १ ते ४ ह्या जागा भरण्याचे कंत्राट ९ खाजगी कंपनीला दिले होते.त्यात कुठलेही आरक्षण नव्हते.सैन्यातील अग्निवीर योजना असो की पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती ह्यात ना आरक्षण आहे ना कायम नौकरी.जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद शाळा बंद करून ते खाजगी कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचे नावावर शिक्षण मंडळाने भरमसाठ शुल्क वाढ केली आहे. ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चार वर्षा पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत.पाच पाच वर्ष शासकीय अधिकारी प्रशासक म्हणून जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर पालिका आणि आता ग्राम पंचायत मध्ये ठाण मांडून बसले आहेत.एसटी,एससी, ओबीसी ह्यांचे साठीचे योजनांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत नाही, दिलेला निधी अखर्चित ठेवून इतर ठिकाणी वळता केला जातो.यादी खूप लांबलचक आहे, हे नुसते दाखले दिले आहेत.
त्या मुळे घटनादत्त आरक्षणाचा बळी घेवून ही संवैधनिक व्यवस्था मोडीत काढणारा मोदी आणि भाजप नुसते खोडारडे नाहीतर अत्यंत लबाड आहेत.
तरीही तोंड वर करून एसटी,एससी, ओबीसी आरक्षण करीता चौकीदार असल्याची घोषणा करतात.मुळात शिक्षण आणि नौकरी मधील आरक्षण हा कुणाच्याही मेहरबानीचा विषय नाही तर ती घटनात्मक व्यवस्था आहे.त्यात कुणीही बदल करू शकत नाही.केवळ राजकीय आरक्षण ह्यास दर दहा वर्षांनी मुदतवाढ दिली जाते.अश्या लबाड लांडंग्यानी आरक्षण आणि एसटी,एससी, ओबीसी हिताची कोल्हेकुई करणे हा चूनावी जुमला आहे.त्याला कुणीही बळी पडू शकत नाही. निवडणूकीत भाजप पराभूत होत असल्याने त्यांना एसटी,एससी, ओबीसी आरक्षण आठवले आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र राज्य
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत