

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय उलथापालथ पाहता या सभांना ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, आज ते जळगाव मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. जिल्ह्यात ही सभा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, निकराने लढू, गड उभारु पुन्हा, असा सभेपूर्वीच त्यांचा टीझर जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खान्देशात उद्धव ठाकरे जळगाव येथे सभा घेत आहेत त्यामुळे ते कुणाचा समाचार घेतील? याची चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शासन आपल्या दारी उपक्रमात सभा घेत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या या सभेला आणखीच महत्त्व आले आहे. टीझरमध्ये तर गर्दीकडे बोट दाखवत ठाकरे यांनी ‘हीच शिवसेना आहे. ज्याला संपवायची आहे, त्याने ती संपवून दाखवावे,’ असे आव्हान दिले आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे कोणावर आणि काय टीका करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत