क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र यांची बीड येथे विषय साधनव्यक्ती यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक संपन्न.

बीड:- दिनांक २४/१०/२०२३
रोजी दुपारी २ वाजता क्रांतिकारी शिक्षक संघटनेची बैठक संघटनेचे संस्थापक सचिव श्री शाहिद काद्री यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. बैठकीत महाराष्ट्र राज्यात एकूण १९९६ विषय साधनव्यक्ती (कंत्राटी तत्वावर) सन २००७ पासून कार्यरत असून व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षताखाली निवड समितमार्फत नेमलेले लोकं आज पर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. २००७ पासून सुरू झालेल्या या संघर्षात आजही त्यांना शिपाई पेक्षा कमी मानधन मिळत आहे. आता पर्यंत सर्वच पक्षांचे नेते मंडळीने वापर करून घेतला पण इतर कार्यरत कर्मचारी सारखे लाभ मिळाले नाही. पीएफ सुविधा नाही, मेडिकल सुविधा नाही, पगारात नैसर्गिक वाढ नाही.
या सर्व विषयावर विचार विमश करण्यासाठी व सरकारपुढे आपली व्यथा मांडण्यासाठी आजची बैठक घेण्यात आल्याचे समजते. आजच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टी निवेदन स्वरूपात सरकारचे प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी यांच्या मार्फत सरकार पुढे मागणी करणार असल्याचे विषय साधनव्यक्ती यांनी माहिती दिली आहे.
वरील सर्व सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी मी आपल्या सोबत कायम खांद्याला खांदा लावून साथ देणार असल्याची हमी संघटनेचे संस्थापक सचिव श्री शाहिद कादरी यांनी यावेळी ग्वाही दिली.आज झालेल्या बैठकीत संघटनेचे संस्थापक सचिव श्री शाहिद कादरी सोबत श्री शेख जावेद खुर्शिद, श्री माजेद शेख, श्री मुजीब इनामदार, श्री वाघमारे भाऊसाहेब, श्री काजी उबेदुल्लाह, श्री शेख अयाज सर्व विषय साधन व्यक्ती व इतर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत