महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

आधुनिक ब्राम्हणांचे कसब!

भारतात सध्या जे काही सुरू आहे त्याला फॅसिझम म्हणत नाहीत तर ब्राम्हणीझम म्हणतात. साम, दाम, दंड, भेद वापरून एकाच समाजाचे राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि एकूणच सामाजिक वर्चस्व निर्माण करण्याचा हा अत्यंत सुसुत्रतेने चालणारा प्रकार आहे. इथे सत्ताधारी आणि मीडियाचे काय घेवून बसला, अगदी विरोधक आणि टीकाकारसुद्धा आपल्याच समाजाचा पाहिजे अशी सोय या व्यवस्थेचे मालक लोक बनवत असतात… आणि बहुजन त्याला नेहमीप्रमाणे बळी पडत असतात.

ब्राम्हणी सत्तेच्या विरोधातल्या आंदोलनात ब्राम्हणच बहुजनांचे वैचारिक आणि राजकीय नेतृत्व करतात ही गोष्ट महात्मा फुल्यांनी ब्राम्हणांचे कसब दीडशे वर्ष आधी लिहूनसुद्धा बदलत नाही हे विशेष आहे. बहुजनांना एक भयानक जातीय न्यूनगंड असतो की ब्राम्हण आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत, सुसंस्कृत आहेत वगैरे. ब्राम्हणांच्या भाषेचे आणि कंपुंचे बहुजनांना इतके कौतुक आहे की त्या कंपूनी आपल्याला त्यांच्यात सामावून घ्यावे, आपल्याला त्यांची भाषा यावी आणि आपले कौतुक त्यांनी करावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

महाराष्ट्रापुरते पाहायचे झाले तर कुठल्याही सामाजिक किंवा राजकीय संस्थेत जाऊन बघा… सगळीकडे वरच्या पदांवर ब्राम्हण… मग ते भाजप असो, काँग्रेस असो, समाजवादी असो, कम्युनिस्ट असो, कामगार संघटना असोत, सेवा दल असो, युक्रांद असो की अजून कुणी असो! आणि तिथे बाकीची अबौद्धिक कामे (याला सेवाभाव हा गोंडस शब्द आहे) करायला, सतरंज्या उचलायला मात्र बहुजनांचा भरणा! मीडियामध्ये तीच अवस्था… खाली जमिनीवर पळायला सगळीकडे बहुजन आणि वर संपादक मात्र ब्राम्हण!

ब्राम्हणांनी आपल्याला नावाजावे, आपल्याला त्यांच्यात सामील करून घ्यावे म्हणून बुद्धीने भ्रमित असणारे बहुजन आयुष्यभर पालखीचे भोई बनून लाचारीचे आयुष्य जगण्यात कृतार्थता मानतात. अगदी परवाच्या क्रांतिकारी सभेचे उदाहरण द्यायचे झाले तर 8 मधील चक्क 6 वक्ते ब्राम्हण, आणि उरलेल्या 2 बहुजनात एकजण संधीसाधू आणि एक ऐन वेळेला घुसवलेला कार्यकर्ता! आणि यांच्यासाठी अंगावर दगड-अंड्यांचा मारा खाणाऱ्या लेकी आणि पोरे मात्र बहुजन! ब्राम्हणी सत्तेच्या विरोधात तुम्हाला निर्भय बनवायला (म्हणजे नेमके काय करायचे हे अजूनही माहीत नाही) येतंय कोण तर सुमार बुद्धीचे आणि निःसंशयपणे ब्राम्हणी व्यवस्थेला गोंजरणारे ब्राम्हण!

महाराष्ट्रातील बहुजनांनी कधी तामिळनाडूमधील बहुजनांचा लढा अभ्यासावा… तुम्हाला स्वतःची आणि स्वतःच्या बुद्धीची लाज वाटेल. आधुनिक ब्राम्हणांचे कसब ओळखा आणि शहाणे व्हा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!