महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आमचं कुलदैवत..!

ऑफीस मध्ये एकाने प्रसाद दिला नि म्हणाला : साहेब, कुलदेवीला जाऊन आलो नवरात्रीत !
वर्षातून एकदा कुलदेवीचं दर्शन घ्यायला पाहिजे.

मी म्हणालो : बरोबर आहे .

त्यानं विचारलं : साहेब तुमचं कुलदैवत कोणतं ?

मी म्हणालो : आमचं कुलदैवत एकदम जागृत आहे.
त्याची २३ हजार देवळ आहेत.
आणि १५ लाख कट्टर भक्त आहेत.

त्यानं विचारलं : तुम्ही कधी हल्ली दर्शन घेऊन आलात ?
मी म्हणालो : आम्हाला दररोज दर्शन घडतं !

तो म्हणाला : साहेब सांगा ना ! तुमचं कुलदैवत कोणतं ?

मी म्हणालो : आमचं कुलदैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!

तो एकदम चरकला.
त्याच्या मणक्यातून शिरशिरी गेलेली जाणवली !!

मी म्हणालो : आता नीट ऐका.
देशात २३ हजार न्यायालय आहेत.
ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतात.
भारतात १५ लाख वकील आहेत.
जे बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास करतात.

आमचं कुलदैवत १४० कोटी लोकांचं अखंड रक्षण करत.
ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत होणाऱ्या निवडणुका हा आमच्या देवाचा उत्सव !!

तळटीप :
बाबासाहेब फक्तं दलितांचे कैवारी होते असं समजत असाल तर तुम्ही अडाणी आहात !!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!