निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

कृषि खतांच्या गोणीवर नरेंद्र मोदींचा फोटो असलेले खत विकत असल्या बाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे तक्रार.

अकोला, दि. २२ – कृषि खतांच्या गोणीवर नरेंद्र मोदींचा फोटो असलेले खत विकण्यास कृषि सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठा केंद्र ह्यांना मनाई करा अश्या आशयाची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे ह्यांना केली आहे.

कृषी खंताच्या गोणीवर पंतप्रधान यांचा फोटो असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना खत विकताना आदर्श आचारसंहिता भंग करू नये म्हणून त्यांनी स्टिकर्स लावून खत विक्री करावी अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल.त्यामुळे खत विक्री आचार संहितेत भंग होणार नाही असे आदेश कृषी विक्रेत्यांना तसेच आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी ह्यांना देण्यात यावा.गोणीवरील पंतप्रधान मोदीजी यांच्या फोटोवर स्टिकर लावून खताची विक्री करावी असे निर्देश अमरावती कृषी अधीक्षक कार्यालयातून सर्व कृषि विक्रेत्यांना देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या खते विभागाने देशात ‘भारत’ या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या, त्यानुसार मागील वर्षीपासून खंताच्या कंपन्यांकडून ‘भारत’ नावाखाली खतांचा पुरवठा होत आहे. आणि त्या खतांच्या गोणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे लोकसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाल्यावर आयोगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र काढून कोणत्याही राजकीय पक्षाचे फोटो तसेच राजकीय नेत्यांचे फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर स्टिकर लावून संबधित वस्तू किंवा खतांच्या गोण्यांची विक्री करावी असे आदेश काढले आहेत
सबब कृषी केंद्र आणि शासकीय कार्यालयात नरेंद्र मोदी किंवा भाजप चे नेते तसेच इतर राजकीय पक्षाचे नेते व दुकाने ह्यावर असलेले फोटो आणि खत विक्री अश्या सर्व ठिकाणी असलेले फोटो प्रचार करीता वापरून आचार संहिता भंग होवू नये ह्या करीता आदेश काढावेत अशी मागणी वंचितने केली आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!