देवगड येथे आलेल्या ३६ विद्यार्थ्यांच्या सहलीतील चार विद्यार्थिनींचा समूद्रात बुडून मृत्यू

पुणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहलीसाठी आलेल्या खासगी सैनिक अकादमीचे पाच विद्यार्थी शनिवारी देवगडच्या समुद्रात बुडाले. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून, मुलगा बेपत्ता आहे. प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे (सर्व १८ ते २४ वयोगटातील) अशी मृतांची नावे आहेत. राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे.
पिंपरी-चिंचवड येथील सैनिक अकादमीच्या ३६ विद्यार्थ्यांची सहल देवगड येथे आली होती. हे विद्यार्थी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील पाच जण बुडू लागले. अन्य काही विद्यार्थ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला आणि हे पाचही जण खोल पाण्यात गेले. चार मुलींचे मृतदेह सापडले असून, एक जण बेपत्ता आहे. सर्व मृतदेह ग्रामीण देवगड रुग्णालयात पाठविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत