आदरणीय सीमाताई पाटील यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आंबेडकरी विचारांचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शाहीर सीमाताई पाटील
अनेक पुरस्काराने सन्मानित होऊन आंबेडकरी विचारांचे भूषण ठरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शाहीरा आदरणीय सीमाताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सीमाताई पाटील ह्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा. सीमाताई पाटील यांच्याबद्दल जितकं बोलाल तितकं कमी आहे. अप्रतिम……. सुंदर गोड गळ्याच्या धनी असणाऱ्या सीमाताई पाटील ह्या आंबेडकरी चळवळ आणि बुध्दांच्या विचारांच्या पाईक आहेत. सीमाताई फक्त शाहिरी, गायिकी, अभिनय ह्याच गोष्टी करीत नसून त्या उच्च दर्जाच्या विज्ञानवादी आहेत. म्हणूनच त्यांनी जातीपातीच्या सर्व “सीमा” ओलांडून,घरातले सगळे काल्पनिक देवी-देवता, देव्हाऱ्यासकट चैत्यभूमी येथील अरबी समुद्रात फेकून देत,जीर्ण रूढी परंपरा नाकारुन,दैववादी जीवन त्यागून,वर्णवादीव्यवस्था झिडकारून २५ ऑक्टोबर २०२० रोजी अशोका विजयादशमी अर्थात धम्मचक्र प्रवर्तनदिनी विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्विकार केला आणि तथागतांनी दिलेल्या धम्माचे आचरण प्रत्यक्ष स्वतः मध्ये अंगीकृत करून प्रचार व प्रसार करण्यासाठी तन मन धन असे कार्य सुरू केले आहे व कार्यरतही आहेत.
ताई, तुमच्या या धम्म कार्यास शतशः प्रणाम
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत