मुंबई तील सर्व बॅनर पोस्टर तात्काळ हटवा: महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणे किंवा खासगी मालमत्तांच्या ठिकाणी लावण्यात आलेले सर्व होर्डिंग, पोस्टर बॅनर तत्काळ हटविण्यात यावे. कोनशिला, नामफलक आदी बाबी झाकून टाकावेत. तसेच निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. इक्बाल सिंग चहल यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला होता.
आदर्श आचारसंहितेचे पालन व त्यातील कार्यवाही याबाबत आयोजित बैठकीत डॉ. चहल बोलत होते. या वेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तआश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हाधिकारीश्री. राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, सर्व प्रमुख अभियंता संचालक यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत