दिनविशेष 6 मे 2024

आज दि. ६ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, चंदवारो, चेत मासो, सोमवार, चैत्र माहे.
६ मे १९२२ – रोजी कोल्हापूर संस्थांनाचे राजे, कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५०% जागा आरक्षण देणारे आरक्षणाचे जनक, संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देणारे सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
६ मे १९२९ – रोजी महाबळेश्वर येथे प्राथमिक शिक्षण प्रसारसंबंधी परिषदेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार राष्ट्रीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे? याचे महत्त्व सांगितले.
६ मे १९३२ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामठी येथील अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लास परिषदेला जाण्यासाठी मुंबई येथून नागपूर मेलने कामठीला रवाना झाले.
६ मे १९३३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला पोहोचले.
६ मे १९४५ – रोजी एन. शिवराज यांच्या पत्नी मिनांबल यांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्ग महिला परिषद संप्पंन्न झाली.
६ मे १९५५ – रोजी मुंबईतील बोरिवली जवळील कान्हेरी येथे वैशाख पौर्णिेमेस आम्रवृक्षाखाली चौथऱ्यावर आसन मांडून विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, “मानवाच्या विवेकबुद्धीला केवळ बुध्दांनी आवाहन केले आहे.” असे विचार मांडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत