निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भाजपा ला जागावाटपाच्या नियोजनात व्यस्त ठेवून शिंदे गटाची प्रचाराचा नारळ फोडून कामाला सुरुवात.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक जाहीर असली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला अद्याप तरी जागावाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही. विदर्भातील रामटेक मतदारसंघ शिवसेनेनं भाजपसाठी सोडावा अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

विशेष म्हणजे सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी कालच त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. काटोल-नरखेड परिसरात त्यांच्याकडून कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. पहिल्या फेरीमध्येच रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अशा सूचना त्यांनी केल्या. रामटेकबद्दल वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना तुमाने यांनी प्रचार सुरू केल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!