मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

“भीमसैनिकाच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचं करायचं तरी काय ?” संकेत भोसले हत्या प्रकरणी धाराशिव येथील भिमसैनिक आक्रमक.

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेचे फोटो विडिओ उपलब्ध असतानाही वॉर्ड पदाधिकारी असलेला आरोपी सापडत नाही ही गृह खात्यासाठी शरमेची असलेली बाब तात्काळ निर्णय घेण्यासाठी परिचित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी खपवून न घेता न्याय करावा ही समाजाची मागणी.

उस्मानाबाद : रविवार दिनांक 11/03/24 रोजी उस्मानाबाद शहर व परिसरातील तमाम संतप्त आंबेडकरी भीमसैनिक आणि सामाजिक धार्मिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया वर धडक मोर्चा काढण्यात आला. “भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्याला तात्काळ अटक करण्यात यावी” या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिवंडी मुंबई येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता बारावीत शिकणाऱ्या भीमसैनिक संकेत अनिल भोसले या तरुणास पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील वार्ड कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सत्तेच्या माजातून आणि जातीय द्वेषभावनेतून अमानुष मारहाण केली. दिनांक 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत उपचार घेत असताना उपचारा दरम्यान संकेत भोसले या तरुणाचा मृत्यू झाला.

भोसले परिवाराचे सांत्वन तर सोडाच पण यादरम्यान शिंदे गटातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भोसले परिवारावर दबाव आणण्याचे व धमक्या देण्याचे तंत्र वापरले. संकेत भोसलेच्या मृत्यू नंतर बॉडी ताब्यात घेणार नाहीत हा पवित्रा भीमसैनिकांनी घेतल्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी जुजबी कारवाई करत तीन आरोपींना अटकही केली आहे. परंतु शिंदे गटातील मुख्यमंत्र्याच्या जवळचा असलेला मुख्य आरोपी मात्र अद्याप ही फरार आहे. मुंबई सारख्या अत्याधुनिक व सक्षम पोलीस दलाला वॉर्ड शाखेवर काम करणारा पदाधिकारी सापडू नये ही आश्चर्याची बाब आहे. खुद्द मुख्यमंत्र्याचे वरदहस्त आहेत म्हणून तर पोलीस अटक करत नाहीत का ? अशी चर्चा सर्वसामान्यात होताना दिसत आहे.

कारण भीमसैनिक संकेत भोसले यांच्या मृत्यूनंतर शिंदे शिवसेनेच्या वार्ड पदाधिकाऱ्याला अटक करण्यासाठी भिवंडी येथे भीमसैनिकांनी आक्रोश मोर्चा काढला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ही इतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धिक्कार करत धरणे आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले. या मागणीला घेऊन धाराशिव जिल्ह्यातील भीमसैनिकांनीही दिनांक 11 मार्च 2024 रोजी बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निघालेला हा मोर्चा सत्ताधारी सरकारचा निषेध करत संकेत भोसलेला न्याय मिळालाच पाहिजे या मागण्यांनी दणाणून गेला. हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधाने परिसर दणाणून जात होता. यावेळी भीमसैनिक बाळासाहेब माने, अशोक कसबे, संदीप अंकुशराव, पृथ्वीराज चिलवंत, सचिन दिलपाक, लेखक विजय बनसोडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

तसेच या धडक मोर्चा च्या माध्यमातून जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले की, संकेत भोसले यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, संकेत भोसले हत्याकांड प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मुख्यमंत्री सहायता निधी मधून 50 लाख रुपयांचे सहकार्य भोसले परिवारास करण्यात यावे, संकेत भोसले यांच्या परिवारास उदरनिर्वाहासाठी पाच एकर जमीन देण्यात यावी यासह इतर मागण्या भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आल्या.

या धडक मोर्चाला यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी धनंजय वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पुष्पकांत माळाळे, मेसा जानराव महादेव भोसले, मुकेश मोठे, कुंदन वाघमारे, स्वराज जानराव इत्यादी अनेक भीमसैनिकांनी परिश्रम घेतले तर या धडक मोर्चा मध्ये ऍड.ज्योती बडेकर, प्रयागबाई चिलवंत, रोहिनाताई गायकवाड, सारिका मस्के, प्रियंका चव्हाण, योगिता मेसा जानराव, मंगल सरवदे, शोभा सोनवणे, विमल कदम यांच्यासह उस्मानाबाद शहरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह परिसरातील अनेक गावांमधून भीमसैनिक उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!