दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठीशासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सांगली जिल्या समध्ये अनुसूचित व नवबौद्ध मुलां/मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्या 06 शासकीय निवासी शाळा, शासकीय इमारतीमध्ये कार्यरत आहेत. या निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली येथे उपलब्ध असल्याचे समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष, ई-लायब्ररी इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो.
प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. निवासी शाळेचे नाव व कंसात मुख्याध्यापकांचे नाव व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे. मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेएकंद ता. तासगांव (पी. सी. भातलंवडे, मो.क्र. 9284801040), मुलांची शासकीय निवासी शाळा, विटा ता. खानापुर (प्रितम भोसले, मो.क्र. 7028010118), मुलांची शासकीय निवासी शाळा, कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ (देवानंद धवसे, मो. क्र. 9420836631, मुलांची शासकीय निवासी, वांगी ता. कडेगांव (एस. एच. भेासले, मो. क्र. 8698029878), मुलींची शासकीय निवासी, बांबवडे ता. पलूस (तानाजी करचे, मो. क्र. 9766040998), मुलींची शासकीय निवासी शाळा, जत ता. जत (डी. डी. जाधव, मो.क्र. 8275207276)
00000

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!