महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

यापुढे निवडणुक लढणार नाही – एकनाथ खडसे

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात खडसे यांनी बऱ्याच विषयावर सूचक वक्तव्य केले. आपण यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असा निर्णयच त्यांनी जाहीर केला.

खडसे हे पक्षांतर आणि घरवापसी यामुळे चर्चेत आले होते, तसेच घरातच एक सदस्य भाजपा मध्ये आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अशा कांहिशा अवघड अवस्थेमध्ये असताना त्यांनी कांहीं दिवसांपूर्वी भाजपा मध्ये घरवापसी करण्याचेही जाहीर केले होते परंतु त्याची तारीख अजुन निश्चित झाली नाही.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी हा निर्णय घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. खडसे यांच्या भाजपप्रवेशाला दिल्लीकडून हिरवा कंदिल मिळाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र भाजपमध्ये प्रवेश कधी होणार, याची मात्र अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाहीये. 

एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, मी या पुढे विधानसभेची निवडणुक लढवणार नाही. मी आता विधानपरिषदेचा सदस्य आहे. हे सदस्यत्व असताना दुसरी  आमदारकीची निवडणुक लढवणे योग्य होणार नाही. तसंच, खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळं खासदारकीची निवडणूकदेखील मी लढवणार नाही. ज्या छोट्या छोट्या निवडणुका आहेत. त्या लढवण्याच्या संदर्भात आजतरी विचार केलेला नाही. असं खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!