तुळजापूरकरांनी अनुभवले शिवकालीन समृद्ध गाव : रामवरदायीनी शाळेचा स्तुत्य उपक्रम


तुळजापूर प्रतिनिधी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंती निमीत्त शहरातील रामवरदायिनी प्राथमिक शाळा तुळजापूर येथील मुख्याध्यापिका श्रीमती शिवणे मॅडम यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याची देही याची डोळा शिवकालीन संस्कृतीची प्रचिती घेत तुळजापूरकरांनी “शिवकालीन गाव” या संकल्पनेतून विद्यार्थ्यानी साकारलेला दिमाखदार चालता बोलता देखावा अनुभवला.
यामध्ये विध्यार्थ्यानी पारंपारिक वेशभूषा केली होती. भारतीय विशेषतः शिवकालीन समृद्ध संस्कृतीचा वारसा आज या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर यावा हा शुद्ध हेतू होता. यामध्ये पारंपरिक जाते, लोणी काढण्याची पद्धत, चुलीवरील स्वयंपाक, बैलगाडी आणि इतरही देखावे केले होते.
कुमारी सिद्धी जाधव हीने शिवगर्जनेने सर्व प्रेक्षकांचे मन जिकून घेतले. विद्यार्थ्यांची भाषणेही झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक हणमंते सर, मुळे सर , दंतकाळे सर, सिंदफळकर सर , थोरात सर , वाघ सर , अभिजीत भोसले सर व शिक्षिका श्रीमती काजळे मॅडम , चव्हाण मॅडम, पोतदार मॅडम, काशीद मॅडम, टोंपे मॅडम, पिनिता शिरसट यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत