दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

देशात भगवान बुद्धाची व संविधानाची समानता रुजविण्याचे काम करावे

-ॲड एस के भंडारे

मुंबई – संविधानाने न्याय ,समानता, स्वातंत्र्य, बंधुताचे दिलेले अधिकार, संविधान विरोधक टप्या टप्याने ते काढुन घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे देशात भगवान बुद्धाची समानता पसरविण्याचे काम करावे. धम्माला महत्व देऊन प्रथम आपली ताकद निर्माण केली, तरच राजकारणात प्रतिनिधित्व मिळेल -सत्तेत सहभाग मिळेल ! त्यासाठी संविधान समर्थक समाज जोडण्यासाठी संपूर्ण देशात संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/समता सैनिक दलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अभियान सुरू केले असल्याची माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी, तथागत भगवान बुद्ध यांच्या 2569 व्या जयंती महोत्सवा निमित्त केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्यावतीने दि.2/5/2025ते 12/5/2025 या कालावधीत 25 जिल्ह्यातून पूर्व प्रवेश परीक्षा नुसार मेरीट मध्ये पास झालेल्या 43 प्रमुख कार्यकर्त्यांचे केंद्रीय शिक्षक धम्म प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर पश्चिम, मुंबई येथे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड डॉ एस एस वानखडे होते.

मुंबईची बौद्ध जनगणना करणार

ॲड भंडारे हे पुढे असे म्हणाले की, देशात उशीरा का होईना जातीय जनगणना होणार आहे, त्यामध्ये आपण ताकदीने काम करणार आहोत. तसेच सरकारच्या अगोदर पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबईची बौद्ध जनगणना मुंबई प्रदेश व बौद्ध महासभा भिक्खु संघ संयुक्तपणे करणार आहे. त्याच्या फॉर्मचे उद्घाटन करण्यात येऊन अँड एस के भंडारे यांच्या हस्ते भंते धम्मराज व मुंबई प्रदेश शाखा सरचिटणीस दयानंद बडेकर व मुंबई प्रदेश महिला शाखा सरचिटणीस सोनाली कटारनवरे यांना देण्यात आले.

ट्रस्टी झाल्याबद्दल भंडारे यांचा सत्कार
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख ॲड एस के भंडारे यांची संस्थेच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी मध्ये ट्रस्टी म्हणून रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲड सुभाष जंजाळे आणि ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य. आंबेडकर यांनी नियुक्ती केल्याबद्दलची माहिती अँड डॉ एस एस वानखडे यांनी सर्वांना देऊन अँड एस के भंडारे यांचा उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी सत्कार केला.

केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा 100 टक्के निकाल

संस्थेच्या केंद्रीय शिक्षक शिबिराच्या शिबिरार्थीची लेखी परीक्षा दि. 11/5/2025रोजी घेण्यात आली, त्यामध्ये सर्व 43 शिबिरार्थी पास झाले.
यावेळी भंते बी सुमेध बोधी, अँड एस के भंडारे यांच्या हस्ते सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रिय महिला विभाग प्रमुख), बी एच गायकवाड, अँड डॉ एस एस वानखडे, यू जी बोराडे यांच्या उपस्थितीत, पास झालेल्या सर्व शिबिरार्थीना गुणानुक्रमें केंद्रीय शिक्षक प्रमाणपत्र, श्रामणेर प्रमाणपत्र व केंद्रीय शिक्षक ओळखपत्र देण्यात आली. प्रथम क्रमांक आलेले पुज्य भन्ते सियांक ( आयु. सिद्धार्थ पिसारामजी बन्सोड, यवतमाळ) यांना 83 % गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक पुज्य भन्ते राहुल बोधी ( आयु. राजेंद्र तुकाराम सोनवणे, पुणे महानगर) व पुज्य भन्ते अनोमदस्सी ( आयु. लक्ष्मण कोंडाजी उबाळे, मुंबई) यांना 75 % गुण मिळाले , तसेच तृतीय क्रमांक पुज्य भन्ते संघपाल (संतोष कृष्णा गायकवाड, ठाणे ) व पुज्य भन्ते वप्प ( विजय अशोक बनसोडे, धाराशिव दक्षिण) आणि पुज्य भन्ते चंदीमा ( चंद्रकांत बाजीराव लहाने, छ. संभाजी नगर) यांना 74 % गुण मिळाले आहेत. या सर्व प्रतिभावंतांना प्रश्नोत्तरातून समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज हे ऐतिहासिक ग्रंथ भेट देण्यात आले. तसेच महाउपासिका मीराताई आंबेडकरांच्या सान्निध्यात हा मौलिक ग्रंथ पुढील 4 गुणवंतांना भेट देण्यात आले. ज्यांनी शिबिरास दान दिले , त्यांनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास डी. एम. आचार्य ( हेडक्वार्टर सचिव ) अशोक रामभाऊ केदारे ( केंद्रीय कार्यालयीन सचिव व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस) सुनील बनसोडे ( केंद्रीय प्रशिक्षण विभाग सदस्य व शिबिर व्यवस्थापक), प्रदीप
कांबळे (चैत्यभूमी व्यवस्थापक व संरक्षण विभाग उपाध्यक्ष मुंबई प्रदेश ), रविंद्र इंगळे ( संरक्षण सचिव महाराष्ट्र राज्य ),मोहन सावंत ( लेफ्टनंट कर्नल एस एस डी ),दयानंद बडेकर ( सरचिटणीस मुंबई प्रदेश ),संतोष मटकर ( संस्कार सचिव मुंबई प्रदेश ) व आयु. अशोक जाधव ( मुंबई प्रदेश संघटक) हे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मनोहर( केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव) यांनी केले. बी एस आय मिडियाचे मिलिंद कदम आणि महादेव गायकवाड यांनी फोटो ग्राफी केली.कार्यक्रमासाठी मुंबई मधील शाखेच्या महिला, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!