
अनंत दा. राऊत
एक गटार दुसऱ्या गटाराला म्हणालं
तू किती किती रे भ्रष्टाचारी मळाने मळलास
अन् असं असूनही तू माझ्या विरोधात बोलतोस
येणाऱ्य निवडणुकीत मला हरवणार म्हणतोस
अरे तुझं भान हरपल की काय
माझ्या हाती ईडी फीडी सारं सारं हाय
गप्प घुमान रहायचं
मी म्हणेल तसं वागायचं
गटार काही ऐकेच ना
त्याची टुरटुर थांबवेच ना
पहिलं गटार दुसऱ्यावर भलतंच संतापलं
अन् पहिल्यानं दुसऱ्यावर ईडीचं घोड चढवलं
दुसऱ्या गटाराला आता दिसलं त्याचं मरण
अन् गुपचूप आलं पहिल्याला शरण
पहिलं गटार म्हणालं
आता तुझी जागा तुरुंगात
नाही तर मिसळ माझ्यात
दुसऱ्या गटाराने शांतपणे गंभीर विचार केला
पहिल्या गटारात मिसळण्याचा
पर्याय त्याने स्वीकारला
आता दोन्ही गटारं
गुण्यागोविंदाने राज्यकारभार हाकत आहेत
देशातली सामान्य जनता
विकास पुरुष म्हणून
त्यांचा जयजयकार करत आहे
या दोन्हीही गटारांना उलथून टाकण्याचा विचार
जनतेच्या मनात उगवणार तरी कधी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत