देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

” नातीगोती.!”

दूर झालेत आप्त स्वकीय,
सगे सोयरे, नातेगोते वर्तमानात,
मी आणि माझं,
कूपमंडूक होऊनी, करून घेतलंय,
बंदिस्त आडात.!

ना येई आठवण, आप्तांची,
असता फोन हाताशी,
न चौकशी करी, ख्यालीखुशालीची,
देखल्या देवाला, दंडवत करी,
वर वर हसून, बोलणे आवरी.!

लग्नकार्य असता घरी,
निमंत्रण पाठवी व्हॉटस अॅपवरी,
ना आग्रह करी,
किमान भ्रमणध्वनीवर तरी,
न जाणवे ओलावा,
न भासे, ओढ भेटीची,
मग सहभागी होण्यास,
तगमग होते, जीवाची.!

माणूस झालाय, अप्पलपोटा,
कामाशिवाय संपर्क ना करी,
लग्नकार्य अन मयता पुरते,
मर्यादित झालीत, नातीगोती सारी,
नसे उपयोगिता, अशा नात्यांची,
त्यापरिस, दुरून डोंगर , दिसे भारी.!

त्यापरिस, दुरून डोंगर दिसे भारी.!!

त्यापरिस, दुरून डोंगर, दिसे भारी.!!!

अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…14/05/2025.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!