शेतकऱ्याने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव काढले विक्रीला.

हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे.हिंगोली येथील एका शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत. हिंगोलीतील माझोड, ताकतोडा, गोरेगाव, केंद्रा बुद्रुक या गावांतील दहा शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयवच विक्रीला काढले आहेत. आमचे किडनी, लिव्हर, डोळे हे अवयव खरेदी करा अशी विनंती त्यांनी शासनाला केली आहे, या शेतकऱ्यांनी तसे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड पडला, त्याचबरोबर सोयाबीनवर यलो मोलॅक रोग आला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. परंतु, आम्हाला शासनाचे अनुदान मिळाले नाही किंवा पिक विमा देखील मिळाला नाही, त्यामुळे बँकांचे पिक कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. स्वतःचे अवयव विक्री करण्याचे हे दरपत्रक सध्या व्हायरल होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत