प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

कु प्रांजल गुरूप्रसाद पाटोळे हिने धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक

पंढरपूर येथील मातंग समाजातील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेली कु प्रांजल गुरूप्रसाद पाटोळे हिने धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला व तिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत निवड झाली यानिमित्त कांबळे परिवाराने तिचा सत्कार चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांच्या हस्ते करण्यात आला, हि छोटीशी प्रांजल पुढे धनुर्विद्या स्पर्धेत ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणार असा ठाम विश्वास प्रबुद्ध साठे यांनी व्यक्त केला व आपण तिला सर्व प्रकारचे सहकार्य यासाठी करणार असल्याचे अभिवचन दिले, प्रथम भगवान गौतम बुद्ध यांच्या स्वरूपास फुले वाहून व संत रविदास महाराज , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी V S कांबळे सर, सविता कांबळे मॅडम, स्वागत कांबळे, वैष्णवी कांबळे मॅडम, प्रांजल चे आईवडील गुरूप्रसाद पाटोळे, उज्वलाताई पाटोळे उपस्थित होते त्याप्रसंगी चे क्षणचित्रे 6/2/2024

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!