महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार

1)भ गौत्तम बुद्ध हेच खरे विचारवंत होते.त्यांच्या इतका महान विचारवंत जगात अजून झालाच नाहीं.
(२) धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे, कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय!
3) लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे, लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती!
(4) द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका!
5) बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात!
6) बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान!
7) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही, तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे!
8) मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते!
9)शिकवा,चेतवा आणि संघटित करा.
10) सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते!
11) शिक्षण ही पवित्र संस्था आहे, शाळेत मने सुसंस्कृत होतात, शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे!
12) विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत, एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे!
13) सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे, धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार!
14) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही!
15) अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे!
16) मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे!
17) जगात म्हणे, सहा विद्वान आहेत, त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते!
18) ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही!
19) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे, कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे!
20) भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही, कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे, एवढी उदारता इतर कोणत्याही धर्मात नाही!
21) सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही!
22) बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याचा एकमेव असा धर्म आहे!
23) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत.या जाती देशविघातक आहेत.कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
24) शक्तिचा उपयोग वेळ आणि काळ पाहून करावा!
25) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.


संकलन: एस बी सिंगारे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!