
नागपूर : ईव्हीएम एक मशीन आहे आणि तिला केद्रीय निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अगेंस्ट ईव्हीएम INDIA AGAINST EVM हॅक केले जाऊ शकते. ईव्हीएमनी निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया संभव नाही, यावर स्वतः सुप्रीम कोर्टने मोहर लावली आहे. असे असल्यावर हि दबावात ईव्हीएमचा वापर करुनच निवडणूक घेण्यावर ठाम आहे. अशा राष्ट्रीय विपदेशी दोन हात करण्यासाठी व्यापक जनांदोलनाची गरज असल्याचे आमसभेत प्रा. रतनलाल यांनी सांगीतले. इंडीया अगेंस्ट ईव्हीएम (ईव्हीम विरोधी राष्ट्रीय जन-आंदोलन) च्या तत्वज्ञानात भारतात होनार्या निवडणूक प्रक्रियेतून ईव्हीएम बॅन करुन भविष्यातील सगळ्या निवडणुका बेलेट (मतपत्रिका) नी घेतल्या जाव्या, या मागणीला समोर ठेऊन विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आमसभेचे आयोजन रवी भवन सभागृह नागपूरमध्ये केले गेले होते. सभेचे आयोजन अॅड. स्मिता कांबळे यांचा अध्यक्षते खाली केले होते. आमसभेसाठी विशेष करुन दिल्ली युनिवर्सिटीचे प्रा. रतनलाल, अॅड. अक्षय समर्थ, प्रीतम बुलकुंडे, अमन कांबळे उपस्थित होते. अॅड. स्मिता कांबले म्हणाल्या की, सुप्रीम कोर्टनी ईव्हीएम मशीनवर बंदीचा निर्णय द्यायला हवा सम्पूर्ण जनता सुप्रीम कोर्ट सोबत राहील. निवडणूक आयोग आणी केन्द्र सरकार यांचे आपसात षड्यंत्र असुन, देशात 2024 ला पुन्हा ईव्हीएमचा दुरुऊपयोग करुन मोदी सरकारला सत्तेत आणण्याची तयारी सुरु आहे. ईव्हीएम संबंधी पेंडिंग याचीकांवर सुप्रीम कोर्ट हियरिंग घेत नाही. सगळा विपक्ष ईव्हीएमच्या विरोधात आहे पण निवडणूक आयोग त्यांना ऐकन्यास तयार नाही. ईव्हीएम कश्या प्रकारे हॅक होते यांचे प्रात्याशीकसुध्दा आमसभेत दिले गेले. नागपुरातसुध्दा लवकरच बँन ईव्हीएम राष्ट्रीय आंदोलन आनखी तीव्र करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. सभेत मोठ्या संखेने वकील वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाची प्रस्तावना ईंजी. विश्वास पाटील यांनी ठेवली. आमसभेच्या यशस्वीतेसाठी अॅड. विनोद खोबरे, अॅड. पवन दहाट, अॅड. विलास राऊत, अॅड. आनंद मनोहर, राज सुखदेवे, राजेश लांजेवार, आनंद तेलंग, हरीष लांजेवार, राजू झोडापे, आंनद पील्लेवान, टारझन ढवले, गौतम पाटील, अजय बागडे, सुलभ बागडे, अरुण भालशंकर, विनोद बंसोड, मयूरी धूपे, हेमलता उमले, अपर्णा चवरे, दिशु कांबले, ज्योती नाईक, भरत लोखंडे, अजय निमगडे अन्य कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत