मद्यार्कापासून विमानाचे इंधन बनवण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प पुण्यात सुरु…

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं काल उद्घाटन झाले. मद्यार्कापासून विमानाचे इंधन बनवण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प पुण्यात सुरु झाला. शाश्वत जैविक हवाई इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हवाई इंधनाला अमेरिकेसह सर्वच यूरोपीय देशांकडून चांगली मागणी असल्यानं त्यासाठी आवश्यक तो कच्चा शेतमाल उपलब्ध करुन देण्याचं मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याचं पुरी यावेळी म्हणाले. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने जगासाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या जैविक हवाई इंधनाच्या पुरवठ्यासाठी जगभरातील अनेक प्रमुख राष्ट्र भारतावरच अवलंबून असल्याचे दावोस इथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक व्यापार परिषदेत देखील दिसून आले असे त्यांनी अधोरेखित केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत