आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

मुंबई : महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं देशभरातील महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) देशभरातील अनेक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) काढून टाकण्याची देखील कारवाई केली आहे.
आयुक्त बंगल्याच्या चार लाखांची थकबाकी ची माहिती आली समोर
मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका आयुक्त यांच्या निवासस्थानाची अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याची सुमारे 4 लाख 56 हजार रुपयांची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात समोर आली होती. यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून याचा खुलासा करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याच्या मालमत्ता कर रकमेचे देयक 5 मार्च 2024 रोजी प्रसारित करण्यात आले होते. मालमत्ता कराचे देयक प्रसारित झाल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते. यानुसार सदर देयक भरण्याची अंतिम मुदत ही 5 जून 2024 पर्यंत आहे. असे असले तरी, सदर संपूर्ण कर देयक अर्थात रुपये 4 लाख 56 हजार इतका भरणा करण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने सुरू केल्याचा खुलासा करण्यात आला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत