ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक.

पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. याला उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून पोलिसांनी अटक केली आहे. यामुळं आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागू शकतो.
ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघे भाऊ ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. भूषणचा नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर मुंबई आणि नाशिक पोलिसांकडून छापेमारी करम्यात आली. यामध्ये तब्बल ६०० कोटी रुपयांच्या ड्रग्जचा साठा आढळून आला होता. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या परिसरात ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली होती. यामध्ये या दोघा भावांचा हात होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत