
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवानी हल्ल्यांची तीव्रता कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर नेतन्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायल येत्या काही दिवसांत हमास विरुद्धचा आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले. आपल्या पक्षाच्या सदस्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, गाझाचा दौरा केल्यानंतर जी स्थिती दिसली त्यावरून इस्रायलची लष्करी मोहीम संपुष्टात आली असे म्हणता येणार नाही. इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. तर इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत २० हजार ६७४ पॅलेस्टिनी ठार झाले असल्याचं गाझाच्या हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले. ‘जटिल आणि गुंतागुंतीचे युद्ध’आपण लढत असून गेल्या काही दिवसांत अनेक सैनिक मारले गेले असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत