“मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजांवर अन्याय होणार नाही” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

सोमवारी ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी केले जाणार नाही आणि इतर समाजांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. हीच भूमिका मंत्री छगन भुजबळ यांची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात स्पष्ट केले आहे. न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यासंबंधी मंत्री भुजबळ यांनी केलेल्या विधानावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.
यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पाचपाखाडी, चंदनवाडी भागातील श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्याकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. आता रुग्णांना तुम्ही उत्तम सेवा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे, असे शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्याकीय विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत