म्हणून मी त्या तरुणांना प्रेक्षक गॅलरीचे व्हिजिटर पास दिले”, खासदाराचं स्पष्टीकरण

सागर शर्मा आणि डी मनोरंजन हे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयाने दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसले होते. हे दोन तरुण खासदारांच्या बाकांवरून धावत सुटले. काही खासदार त्यांना पकडण्यासाठी पुढे आल्यावर या दोघांनी स्मोक कॅनद्वारे सभागृहात पिवळा धूर पसरवला. हे दोन्ही तरुण किजिटर पासच्या मदतीने सभागृहाच्या वर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत बसले होते. तिथून या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या होत्या. परंतु, या दोघांना कोणत्या नेत्याने/खासदाराने व्हिजिटर पास बनवून दिला असा प्रश्न उपस्थित केला जात होता. भाजपाचे म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयाने या दोन्ही तरुणांना व्हिजिटर पास बनवून दिला होता.
लखनौचा सागर शर्मा आणि म्हैसूरचा डी. मनोरंजन यांनी खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयातून बनवून घेतलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश मिळवला होता. दरम्यान, खासदार प्रताप सिंह यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रताप सिंह यांच्याकडे याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर उत्तर देताना प्रताप सिंह यांनी सागितलं की, दोन आरोपींपैकी एकाच्या वडिलांनी माझ्याकडे व्हिजिटर पास मागितले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत