नाशिकमध्ये रचना विद्यालयाच्या जागेवर भूमाफियांचा डोळा, पत्र्याचे शेड उभारून बळकावण्याचा प्रयत्न

नाशिक: शहरातील नामांकित रचना विद्यालय या शाळेची जागा भूमाफियांनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रातोरात पत्र्याचे शेड उभारत ती बळकावण्याचा भूमाफियांचा प्रयत्न होता. या विरोधात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार देवयानी फरांदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत न्यायालयीन निर्णयाशिवाय जागेवरील परिस्थितीत बदल करण्यास प्रतिबंध केला. शहरातील जमिनींचे दर गगनाला भिडल्यानंतर भूमाफियांचे अनेक कारनामे आजवर उघड झाले आहेत. भूमाफियांकडून जागा कशा बळकावल्या जातात, यावर दीड वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी सरकारला पत्र लिहून प्रकाशझोत टाकला होता. शासकीय व खासगी जमिनी बळकावण्यासाठी धडपडणाऱ्या भूमाफियांची नजर आता शैक्षणिक संस्थांच्या जागांवर असल्याचे उपरोक्त घटनेतून समोर आले. भूमाफियांच्या दडपशाहीने संस्था चालकांसह शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत