कोकण विभागासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट

राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाने राज्यातील यंदाची पावसाची सरासरी गाठली आहे. अशात हवामान खात्याकडून कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळेल. काय आहे नेमका हवामान खात्याचा अंदाज? वाचा सविस्तर. मुंबई : राज्यामध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अशात हवामान खात्याकडून आता पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत