जरांगे पाटलांना रांगोळीच्या माध्यमातून मानवंदना देण्याची दिमाखात तयारी

हिंगोलीतल्या डिग्रस फाटा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उद्या सात-बारा रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान याच मैदानावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी आठ कलाकार मागील सहा तासापासून काम करत आहेत.
ही रांगोळी साकारण्यासाठी दोन क्विंटल रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेली प्रतिमा 35× 40 फूट जागेवर साकारण्यात आली आहे. त्याखाली एक मराठा एक कोटी मराठा अशा पद्धतीने लिहिण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत