
मदत पुरवण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वयकाची नेमणूक करण्याची विनंतीही ठरावात आहे. मदत साहित्य मानवतावादी आहे किंवा नाही याची खातरजमा करुन त्याला सुरक्षित मार्ग देण्यात यावा असं त्यात म्हटलं आहे. संघर्षग्रस्त गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मानवतावादी दृष्टीकोनातून पुरवली जाणारी मदत सुरक्षितपणे आणि वेगाने जावी याकरता ठोस पावलं उचलण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षापरिषदेने मंजूर केला आहे. संयुक्त अरब अमिरातींनी हा ठराव मांडला होता. ही मदत घेऊन जाणाऱ्या कर्माचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना करण्याचा अंतर्भाव या ठरावात आहे. इस्राएल आणि हमास ने ओलिसांची तातडीनं सुटका करावी आणित्यांनाही मानवतावादी मदत मिळण्याची ग्वाही द्यावी अशी मागणी ठरावात केली आहे.
या क्षेत्रात गेल्या ७५ दिवसात मानवतावादी सहाय्य घेऊन जाणाऱ्या १३६ कर्मचाऱ्यांनी जीव गमावल्याचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे. संघटनेचे अनेक कर्मचारी बेघर झाले असून युएनच्या कर्मचाऱ्यांची एवढी वाताहत यापूर्वी कधी झाली नव्हती असं म्हणत गुटेरस यांनी संघर्षग्रस्त क्षेत्रात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत