देश-विदेशमुख्यपान

जगातील आठवा खंड सापडला; समुद्रातील महाद्वीपाला संशोधकांकडून ‘झिलँडिया’ नाव.

दि.28. जग सात खंडांनी निर्माण झाले आहे, हे ज्ञात आहे. पण आता आठवा खंडही अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे. भूवैज्ञानिकांनी ३७५ वर्षांपासून लपलेला हा खंड शोधला आहे. या खंडाला ‘झिलँडिया’ असे नाव देण्यात आले आहे.

भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूकंपशास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘झिलँडिया’ अर्थात ‘ते रिउ-ए-माउई’चा सुधारित नकाशा तयार करण्यात आला आहे, असे ‘Phys.org’ने म्हटले आहे. समुद्रात दोन किलोमीटर खोलीवर हा खंड आढळून आला आहे. संशोधकांनी समुद्राच्या तळाशी असलेल्या खडकांच्या नमुन्यांच्या माहितीचा वापर करून या खंडाचा शोध घेतला आहे. हा खंड पाण्यात असल्याने तेथे पोहोचणे शक्य नाही.
‘झिलँडिया’ची वैशिष्ट्ये

  • विस्तार ४९ लाख चौरस किलोमीटर. मादागास्करच्या आकारापेक्षा सुमारे सहापट मोठे क्षेत्र
  • सर्वांत लहान, निमुळते आणि नव्या खंडाचा विक्रम नावावर
  • नव्या खंडाचा ९४ टक्के भाग पाण्याखाली
  • न्यूझीलंडप्रमाणे मूठभर बेटाचा भाग
  • सुमारे ५५ कोटी वर्षांपूर्वी झिलँडिया हा प्राचीन महाखंड गोंडवानाचा भाग होता
  • भूगर्भीय हालचालींमुळे झिलँडियाचा भाग वेगळा होऊन समुद्रात विलीन झाला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!