नागपुरात एसटीची सुरू झाली पहिली स्लीपर कोच.

नागपूर: दि. 9ऑक्टोम्बर
उपराजधानीतून एसटीची पहिली ‘लक्झरी स्लिपर कोच’ शनिवारी दुपारी ३ वाजता पुण्याच्या दिशेने रवाना झाली. ही बस रविवारी सकाळी ९.२० दरम्यान पुणे येथे पोहचली. या बसचे भाडे १,५९५ रुपये आहे. दिवाळीपूर्वी ही बस सुरू झाल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यावेळी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे म्हणाले, प्रवाशांना लक्झरीचा अनुभव देणाऱ्या या सहा नव्या कोच्या बसेस नागपूर- पुणे मार्गावर सुरू झाल्या आहेत. या बसला नागपूर ते पुणे दरम्यान कोंढाळी, तळेगाव, कारंजा, अमरावती, चिखली, औरंगाबादसह एकूण १४ थांबे राहणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत