लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……
महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना, हे लक्षात ठेवा…….
*लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते......*
*तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते...... *
*लाडक्या बहिणीनो आणि मातांनो....
*" 1500 × 5 = 7500/- रुपयाच्या आमिषाला बळी पडून तुमच्या प्राणाची किंमत केवळ 7500/- होऊ देऊ नका. कारण आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा हा आमचा मताचा अधिकार आहे. तेंव्हा तुमच्या प्राणाची किंमत केवळ 7500/- रुपये........!*
*" ते पॆसे जर लाडक्या भावाने म्हणजे अर्थमंत्री अजित पवार यांनी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनीच निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील आर्थिक संपतीच्या आकड्यातून जर दिली असती, तर लाडका भाऊ खरोखर ठरला असता.....!*
*परंतू , हे 7500 /- आम्ही ( बहिणी ) न मागताच आमच्या नावावर 46000 कोटी रुपयाचे भांडवली बाजारातून ( 100/- रुपयाचा मुद्रांक 500/- रुपये केला. शिवाय 100/- सोयाबीन तेल बॅग 135/- वर नेली, इतर वास्तुवर ड्युटी 20% वाढवली ) उभे करुन महागाई वाढवली. आणि वर्षभर योजनेसाठी 46000 कोटी रुपये उभे केले. त्यापैकी 5 महिन्याचे 21000 कोटी वाटले, उर्वरित 25000 कोटी रुपये निवडणुकीत वापरण्यास मोकळे झाले.....!*
*जरी भाजपचे, महायुतीचे सरकार आले, मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, अजित पवार किंवा आणखी कुणीही जरी झाले. तरी लाडकी बहीण कडकी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवाची किंमत केवळ 7500/- च राहणार....!*
*हे मला तुम्हाला सांगण्याची गरज का पडते, तरी तुम्ही फार भावनिक होऊन मतदान करता म्हणून, सांगणे आवश्यक आहे.*"
*" आमच्या महाराष्ट्रीयन माता भगिनींना, मुलींना सुरक्षा आवश्यक आहे, शिक्षण आवश्यक आहे, उच्चं शिक्षण आवश्यक आहे, महिलांना 33% आरक्षणाच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे, खाजगी सार्वजनिक ठिकाणी नोकरीं करत असतांना तेथे सुरक्षेची हमी पाहिजे, रात्रीच्या वेळी कामावरून एकटी येता जातांना सुरक्षेची हमी पाहिजे, निर्भया सारखी प्रकरणे, बदलापूर सारखी प्रकरणे कधीही घडू देणार नाही, याची हमी पाहिजे, स्वाभिमानाने समाजात ताठ मानेने जगण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.*
*केवळ 7500/- रुपयात वरील सर्व हमीची किंमत ठरवणार आहात का.....?*
*जेंव्हा तुमच्या घरात अनेक पाहुणे येतात, त्यांना पाहुणचार करुन पोटभर पहिल्यांदा जेऊ घालून तुम्हाला उरो किंवा न उरो याचा विचार न करता पाहुण्यांची बरोबरी करता......!*
*असा त्याग तुम्ही जीवनभर करत आला आहात.... 🙏*
*त्या त्यागाची परतफेड तर आम्ही पुरुषमंडळी कधीही करूच शकत नाही......*
*परंतू , हाच त्याग इथेही दाखवा की 7500/- रुपयात आपले मोलाचे मत भावनेच्या आहारी जाऊन मातीमोल करू नका.... 🙏*
*कारण तुम्हीच साऱ्या विश्वाला जन्माला घातलेलं आहे....*
*🙏तुम्हीच जगाची माता आहात.... 🙏*
🙏तुमच्याच हातात सर्वकाही आहे….🙏
🙏कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे, की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल…….
जर कदाचित कडेलोट झालाच तरी आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून टाकून आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेऊ…… 🙏🙏🙏🙏🙏
*कारण हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्यासाठी आहे..... 🙏*
*तेंव्हा ही जबाबदारी माझीच असून मीच त्याला जबाबदार आहे. म्हणूनच मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकन महिलांच्याही अगोदर मला सन्मानाने मताचा अधिकार दिलेला असतांना........*
*मी 7500/- रुपयात माझे मत कशीकाय विकेन.......?*
*असा निर्धार करुनच मतदान करा...... 🙏🙏🙏🙏🙏*
विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….. 🙏
*आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक :- अनंत केरबाजी भवरे (संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689 )*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत