मुख्यपान

‘सिंघम अगेन’ आणि ‘पुष्पा-2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर.

अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटाची आणि अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता ‘सिंघम अगेन’ की पुष्पा-2 या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘CONFIRMED,आता सिंघम अगेन विरुद्ध पुष्पा2 होणार आहे.’ तरण आदर्श यांच्या या ट्वीटला कमेंट करुन कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याबाबत नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘सिंघम पुन्हा त्याचे 13 वर्षांचे वर्चस्व दाखवणार आहे.’ तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,’मला अजूनही वाटतं अगर पुष्पा 2 आणि सिंघम 3 यांची टक्कर झाली तर सिंघम 3 ओपनिंग-डेला चांगली कमाई करेल. सिंघमची क्रेझ आहे.’
अजयच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची घोषणा देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती.सिंघम या चित्रपटाच्या दोन भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिंघम हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता तर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स हा चित्रपट रिलीज झाला होता. आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!