प्रत्येक निवडणुकीवेळी पक्ष गहाण ठेवण्याची राज ठाकरेंची पद्धत. – विनायक राऊतांची जहरी टीका.

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज ठाकरे यांना मुंबई मधून एक जागा मिळण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
दरम्यान भाजप-शिवसेना युतीतील, त्यातही प्रामुख्याने मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
मनसेला लोकसभेची एखादी जागा द्यावयाची झाल्यास, ती कमळ वा धनुष्यबाण या चिन्हावरच दिली जावी, इंजिन या निवडणूक चिन्हाला मुंबईतून मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार नाही, असे युतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत. एकही खासदार नसला तरी राज ठाकरे हे युतीचे स्टार प्रचारक असणार आहेत आणि याचा मनसे ला भरपूर फायदा होईल अशी चर्चा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत