नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात यूनिटीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गौरव

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या वतीने नळदुर्ग आणि परिसरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांची बुद्धी तल्लक व्हावी या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थांची गुणवत्ता वाढावी हा दृष्टिकोन मनाशी वाळवून यूनिटी मल्टीकॉन कंपनीच्या वतीने यावर्षी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या शेकडो विद्यार्थ्याने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता युनिटी मल्टीकॉन गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यांना प्रेरणा दिली जाते केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर संपूर्ण शहरासाठी आणि शहरातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी यूनिटी मल्टीकॉन ही प्रेरणादायी आहे असे परखड मत धाराशिव जिल्ह्याचे माजी नियोजन समिती सदस्य शिवाजीराव मोरे हे अध्यक्षीय समारोप करताना केले .
नळदुर्ग शहरात नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांचे निकाल जाहीर होताच स्पर्धाच पारितोषिक वितरण सोहळा नळदुर्ग ऐतिहासिक किल्ल्यामध्ये बारादरीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्या वेळेस ते बोलत होते
या कार्यक्रमाचे नियोजन युनिटी मल्टीकॉन कंपनीचे कार्यकारी संचालक कपिल मौलवी संचालक जय धवल करमरकर संचालक वैशालीताई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी केले
तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष नितीन कासार , माझी .उप नगराध्यक शफीभाई शेख , माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी ,माजी नगरसेवक बसवराज धरणे ,
भाजपचे नेते सुशांत भुमरकर , माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण , डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे , पत्रकार विलास येडगे , शिवाजी गायकवाड काँग्रेसच्या तालुका महिला आघाडी प्रमुख सुभद्राताई मुळे काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा कल्पनाताई गायकवाड शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन भैरवनाथ कानडे , शोएब काझी आदीजन उपस्थित होते .
निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या निबंध स्पर्धा पारितोषीक
[ प्रथम क्रमांक ] कदम संस्कृती [ द्वितीय ] घोडके मयुरी [ तृतीय ] पवार ज्ञानेश्वरी [ चतुर्थ ] महेक पठाण [ पाचवा ] जगताप आकांक्षा [ उत्तेजनार्थ ] शांभवी संतोष तर चित्रकला स्पर्धा [ प्रथम क्रमांक ] तुळशी मुरमुरे [ द्वितीय क्रमांक ] जानकी माताडे [ तृतीय क्रमांक ] ज्ञानेश्वरी माळी [ चौथा क्रमांक ] पूजा सगर [ पाचवा क्रमांक ] कुताळे श्रुती [ उत्तेजनार्थ ] अलिफा अफजल या विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक तथा कंपनीचे पी आर ओ [ जनसंपर्क अधिकारी ] विनायक अहंकारी यांनी केले .
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत