महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

धम्ममित्र दिक्षा घेणे म्हणजे धम्मचरणाची जबाबदारी स्विकारणे : धम्मचारी रत्नदर्शी

लाखांदूर तालुक्यातील तई/खुर्द येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ व धम्मवर्ग तई/खुर्द यांच्या वतीने धम्ममित्र दिक्षा समारंभ दि. २४ डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागपुर येथील धम्मचारी रत्नदर्शी यांनी ३ पुरुष व १३ महिला अशा १६ लोकांना धम्ममित्रांची दिक्षा
दिली. बारव्हा ज्यावेळी आपण धम्ममित्र दिक्षा घेतो, त्यावेळी आपण कर्माने बौद्ध होण्याची जबाबदारी घेतो. आपले स्वभाव बदलविणे, मनाचे परिवर्तन करणे, संपुर्ण जीवन बदलविणे, आजुबाजुचे वातावरण बदलविणे, जुणे संस्कार बदलविणे असी धम्ममित्र दिक्षा घेणे म्हणजे खराखुरा बौद्ध बनने होय असे प्रतिपादन धम्मचारी रत्नदर्शी यांनी केले. ते तई/खुर्द येथे धम्ममित्र दिक्षा समारंभ प्रसंगी बोलत होते. भगवान बुद्धांनी दिलेल्या नैतिकमुल्यांचे आचरण करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सदाचारी व नितीमान समाज घडविणे हा उद्देश्य समोर ठेवुन हे नवोदित धम्ममित्र त्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्रिरत्न बौद्ध महासंघाची ही धम्मचळवळ मुंबई, पुणे, नागपुर सारख्या मोठ्या शहरांच्या सीमा ओलांडुन भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तई/खुर्द सारख्या खेड्यापाड्यात पोहचत आहे. ज्यासाठी धम्मचारी जीनसागर हे अथक परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी नागपुर येथील धम्मचारी कुशलरत्न, धम्मचारी श्रमणबोधी हे मंचावर उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावाच्या आजुबाजुच्या परिसरातील धम्मबंधुभगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धम्मचारी जीनसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनवास बारसागडे, ओमराज शेंडे, अश्विन दहिवले, देवचंद बारसागडे, रुतीक बारसागडे, चेतन शेंडे, अविनाश शेंडे, अमर शेंडे, राजश्री बारसागडे, टीना शेंडे, अश्मिता बोरकर, शताब्दी शेंडे यांनी सहकार्य केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!