कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी याचिका दाखल; भुजबळांच्या अडचणीत वाढ

दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनासंदर्भातील घोटाळा प्रकरणी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता दिसत आहे. या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या भुजबळांविरोधात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई हायकोर्टात नव्याने याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील सुनावणी आज 1 एप्रिल रोजी होणार आहे. दमानिया यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

2005 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. छगन भुजबळ यांनी आपल्या कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिल्याचा आरोप होता. छगन भुजबळ यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला महाराष्ट्र सदन प्रकरणात कारवाई करण्यासाठी परवानगी दिली. सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला. छगन भुजबळ यांच्याविरोधात कारवाई सुरु झाली. मार्च 2016 साली भुजबळ यांची 10 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली होती, यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे 2 वर्ष म्हणजेच 2016 ते 2018 तुरुंगात होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!