मुख्यपान

२०३१-३२ पर्यंत अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु – मंत्री डॉ जितेंद्र सिंह

देशातल्या अंतराळ स्टार्ट-अप्समधली गुंतवणूक यावर्षी १२४ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. अंतराळ उद्योगाशी निगडीत आर्थिक उलाढाल सुमारे साडे ८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. केंद्र सरकारने वर्ष २०३१-३२ पर्यंत अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत असं अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. सध्या ही क्षमता ७ हजार ४८० मेगा वॅट आहे.
भारतीय अंतराळ धोरण २०२३च्या अंमलबजावणीमुळे २०३३ पर्यंत हा आकडा ४४ अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!