महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

मारुती बनसोडे यांची तुळजापूर तालुका बाल संरक्षण समिती सदस्य पदी निवड…

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग चे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांची तुळजापूर तालुका बाल संरक्षण समितीवर सामाजिक कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे माननीय तहसीलदार साहेब हे या समितीचे अध्यक्ष असून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत ही निवड पाच वर्षासाठी आहे मारुती बनसोडे हे गेली ३८ वर्षे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत असून त्यांनी बाल पोतराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक पुनर्रचनासाठी काम केले आहे त्याचबरोबर संकटात असलेल्या बालकांना संरक्षण देण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे काम केले आहेत .या कामाची दखल घेऊन सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी या समितीवर त्यांची निवड केली आहे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मारुती बनसोडे यांनी जिल्ह्यामध्ये गेली 27 वर्ष फार मोठे काम केले आहे. महिला व बालकांच्या प्रश्नावर विशेषतः त्यांनी काम केले असून महिला बचत गट, विधवा, निराधार,परित्यक्ता एकलमहिला,शेतकरी ,शेतमजूर ,अल्प खर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसाराचे काम ही ते करीत आहेत तर पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियानामध्येही सध्या ते काम करीत आहेत. जिल्ह्यातील अनेक बालकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. म्हणून त्यांची ही निवड सार्थ आहे या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!