दैनिक जागृत भारत.com या बहुजनांच्या हक्काच्या e-paper संदर्भातील महत्वाची बैठक संपन्न.

सोलापूर – शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर येथे आयु. डी. एस. सावंत सर मुंबई, आयु. प्रा.एम.आर. कांबळे सर, ज्येष्ठ विचारवंत आयु. दत्ताजी गायकवाड, आयु.उत्तम क्षीरसागर सर, आयु. प्रशांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली.
अनौपचारिक असलेल्या या बैठकीचे आयोजन सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीला सोलापूर शहर व जिल्ह्यातील निष्ठावान भीमसैनिक तसेच बहुजन समाजातील पत्रकारिता क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवर उपस्थित होते.
भविष्यात बहुजनांच्या प्रश्नावर निर्भिड आवाज उठवणारे हक्काचे वृत्तपत्र, संकेत स्थळ, चॅनल असावे हा विषय घेऊन विस्तृत चर्चा करण्यात आली व भविष्यातील रणनीती साठी आवश्यक त्या शक्यता पडताळून पाहण्यात आल्या.
पुढील बैठका येत्या शनिवार रविवारी दिनांक १४ व १५ तारखेला उस्मानाबाद व लातूर या ठिकाणी घेण्या संदर्भात विचार विनिमय झाला.
या महत्वपूर्ण बैठकीस बाली मंडेपू, दत्ता थोरे, किरण बनसोडे, केरू जाधव, चन्नविर वीरभद्रेश्वरमठ, सोमनाथ मुसांडे, महेंद्र शिरसाट, अमोल आठवले, सुकांत वाघमारे, बबलु खळसोडे, अंबादास आळगिकर, पांडुरंग रतलू, शाम केंगार, हाजी तांबोळी, बाळासाहेब गवळी आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत