आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मनी लाँडरिंग प्रकरणी असोसिएटेड जर्नल या कंपनीच्या ७५१ कोटी रुपये मालमत्तेवर टाच.

दिल्ली, मुंबई, लखनौ आणि इतर शहरातल्या मालमत्ता ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने असोसिएटेड जर्नल या कंपनीच्या ७५१ कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. ईडीने एक्स समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधे गुन्ह्यातून मिळवलेला पैसा या मालमत्तेत गुंतवण्यात आल्याचं तपासात आढळलं, असं म्हटलं आहे.

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणाचा तपास सुरु असून  यापूर्वी ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने या दोघांना सध्या जामीन दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!