
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटीं रुपयांचा करार काल झाला. तर जिंदाल उद्योग समूहाबरोबर ४१ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.तत्पूर्वी जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचं केंद्र निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स कंपनीबरोबर ४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत