
कोची इथं होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्रीांच्या हस्ते ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिर आणि गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराला प्रधानमंत्री आज भेट देणार आहेत. तसंच त्रिशूर जिल्ह्यातल्या गुरुवायूर मंदिर आणि त्रिप्रयार श्रीरामासमी मंदिरात पूजा करून ते दर्शनही घेतील. यामध्ये नवीन ड्राय डॉक सुविधा आणि कोचीन शिपयार्डच्या आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधेचं आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या एलपीजी आयात टर्मिनलचं उद्घाटन प्रधानमंत्रीांच्या हस्ते होईल. मरिन ड्राईव्ह इथं प्रधानमंत्री मोदी भाजप शक्ती केंद्राच्या प्रमुखांशी संवाद साधतील. दरम्यान प्रधानमंत्री मोदी यांनी काल कोचीमधील महाराजा महाविद्यालयाच्या मैदानापासून एर्नाकुलमच्या शासकीय विश्रामगृहापर्यंत रोड शो केला. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन उपस्थित होते. हजारो समर्थकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं. तत्पूर्वी आंध्र प्रदेशमधल्या श्री सत्य साई जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सीमाशुल्क, अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थविरोधी राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन मोदी यांनी केलं. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. काल पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातल्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात पूजा केली आणि रामकथा पठणात भाग घेतला. माता सीतेचा रावणापासून बचाव करताना जटायू लेपाक्षी इथं धारातीर्थी पडला असं मानलं जातं. या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही संस्था उभारण्यात सहकार्य केल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकारचे आभार मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत