हिटलर-मुसोलीनीच्या वारसदारांनी लोकशाही चॕनल बंद पाडलाय.त्या उघडया-नागडया पिलावळीचा मी निषेध करतो.

विशाल हिवाळे (संविधान अभ्यासक आणि प्रचारक) 9022488113
लोकशाही चॕलने सत्य दाखवून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कर्तव्य पार पाडले.बेभान झालेल्या हुकूमशाही शक्तिच्या पिलावळीचं उघडं-नागडं सत्य निडरपणे जनते समोर आणलं म्हणून हे चॕनल बंद करण्यात आलंय.आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना संपुष्टात आणायचं नाही तर कायमचं जेरबंद करायचं हि हिटलर-मुसोलीनीची आधुनिक पद्धत असली तरी या देशातील मनुवादयांकरिता ती हजारो वर्षापूर्वीची शासन व्यवस्था आहे.ज्या व्यवस्थेत ब्राह्मण्यवादयां व्यतिरिक्त इतर कुणालाही शिक्षेत सूट नाही.काल बिलकीस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आशेच किरण दाखविला मात्र या प्रकरणातही मनुवादी शासन व्यवस्थेची नियमावली अनुसरली होती. 1950 ते 2014 पर्यत मनुवादयांना त्याचा जूना अजेंडा रेटता येत नव्हता.लोकशाही व्यवस्था नष्ट करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा होता आणि आहे.त्याकरिता ब्राह्मण्यवादी मंडळींनी आयुष्य पणाला लावलंय.संविधान टिकलं तर त्यांचा धंदा बंद पडतोय,बहुजन समाज शिकून संविधानिक वाटा मागतोय हे त्यांच्या अस्तित्वाला सुरूंग लावणारं ठरतंय.म्हणून कोणत्याही थराला जाऊन लोकशाही-संविधान संपुष्टात आणायचंच हा मनूच्या वारसांचा एकमेव उद्देश आहे.वास्तविक 2014पासुन त्यांनी बेदरकारपणे वास्तव मांडणारी मिडीया आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करणारे लढवय्य पत्रकार बाद केलेत.असंख्य मिडीया आणि पत्रकारांचा छळ करून त्यांना जेरीस आणणारी व्यवस्था निर्माण केलीय.आज केवळ लोकशाही चॕनल बंद केलंय.भविष्यात असे चॕनल, मिडीया आणि पत्रकारांच अस्तित्व उरणार नसल्याचं इशारा दिलाय. साथीयो,लोकशाहीवादयां समोरचा भविष्यातील अंधार गढद होत चाललाय.भावी पिढयांची गुलामी अधोरेखित होतेय.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्या प्रमाणे शेळी होऊन शंभर वर्ष जगायचं की वाघ म्हणून एक दिवस सन्मानाने जगायचं!हा क्रांतिकारी विचार डोक्यात घेऊन जगण्याची वेळ आलीय.बघा जमलं तर पुढील तीन-चार महिने लढा-संघर्ष करा आणि हुकूमशाही व्यवस्थेला रोखा.मी हिटलर-मुसोलीनीच्या भारतातील हुकूमशाही वारसदारी व्यवस्थेला रोखेल आणि उगवत्या मनुवादाला गाडेल हा आत्मविश्वास बाळगून जोमाने सुरूवात करा.लढेंगे हम तो जितेंगे हम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत