NCCF आणि नाफेड राज्यातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार.

एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी आज नाशिकमध्ये ही माहिती दिली. केंद्र सरकारनं एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून राज्यातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. देशातील ६५ ते ७० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातून खरेदी करणार असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं. नाशिकसह अहमदनगर, धुळे, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून कांदा खरेदी सुरू केली आहे. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवणार असल्याचं चंद्रा यांनी बातमीदारांना सांगितलं. आतापर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत अंदाजे पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. एनसीसीएफनं दोन लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं.
एनसीसीएफच्या वतीनं ग्राहकांच्या फायद्यासाठी दिल्ली, कोलकाता, पाटणा, बंगळुरू, मुंबई आणि नाशिक अशा ११४ शहरांमध्ये १ हजार १५५ मोबाइल व्हॅनद्वारे २५ रुपये किलोनं कांदा विक्री सुरू केली आहे. कांदा, गव्हाचं पीठ, डाळीपाठोपाठ एनसीसीएफतर्फे मूगडाळ आणि तांदूळदेखील अत्यल्प दरात विक्री करणार असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत