मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

हसोरी गावात भूकंपाचे धक्के.

सोमवारच्या भूकंपानंतर बुधवारी रात्री पुन्हा हासोरीसह उस्तुरी आणि हारीजवळगा गावालाही भूकंपाचा धक्का बसला. ८:४९ आणि ८:५७ वाजता दोन धक्के बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, तर बुधवारी रात्री ८:५७ वाजता बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद १.६ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे, असे लातूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.

सोमवार, २ ऑक्टोबर रोजी दिवभरात हासोरी येथे भूकंपाचे तीन धक्के बसले. या धक्क्यातून ग्रामस्थ सावरतात तोच बुधवारी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. आधीच भयभीत झालेले ग्रामस्थ अंथरुणाला पाठ टेकवताच झालेल्या धक्क्यामुळे जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळ काढत रस्त्यावर आले, तर जनावरे, खुराड्यातली कोंबड्या सैरावैरा धावू लागल्या. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात भूकंपाची मालिकाच सुरू होती. तेव्हाही रस्त्यावर धरणे, आंदोलन, उपोषण करून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. गावच्या पुनर्वसनाची मागणी त्यांनी लावून धरली होती. शासनाने तातडीने तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ९ कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, केवळ ३ कोटी २० लाखच मंजूर झाल्याचे पत्र ग्रामस्थांच्या हाती पडले. अद्यापही हा निधी ग्रामस्थांच्या पदरी पडला नसल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली बरमदे यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!