डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

वडाळा मुंबई येथील पी. ई. एस. शिक्षण संस्थेच्या डॉ. आंबेडकर वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. यशोधरा वराळे मॅडम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले एन.सी.सी. प्रमुख ए. एन. ओ. प्रा जी. एन. कुवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. कॅडेट्सने ड्रिल प्रात्यक्षिक या सारखे सादरीकरण केले त्यानंतर फ्लॅग एरिया सादरीकरण नृत्य सेक्शन अटॅक प्रात्यक्षिक यासारखे अनेक उपक्रम सादर करण्यात आले
या क्षणाचे औचित्य साधून एन. सी .सी .च्या सर्व विद्यार्थ्याने वर्षभरात मिळविलेल्या विविध संपादणुकाबद्दल कॉलेजच्या प्राचार्या डाॅ. यशोधरा वराळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व मेडल्स देऊन त्यांचा येथोचित सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या
प्राचार्य डॉ. यशोधरा वराळे मॅडम ज्यू कॉलेजचे उपप्राचार्य बी. एस. पाटील सर पर्यवेक्षक प्राध्यापक अनिल वानखेडे सर प्राध्यापक एम.सी.वी.सी चे इन्चार्ज गोविलकर सर, प्रा. बि.डी. गडदे सर, प्रा के. झेड. पाटील सर, प्रा टि.जी. कोकाटे सर, प्रा एम. एस. गायकवाड सर व ज्यू कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत